AO3 News

Post Header

Published:
2020-04-27 20:10:32 -0400
Original:
April 2020 Drive: Thanks for your Support
Tags:

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ची एप्रिल सदस्यता मोहीम नुकतीच संपली आणि आम्ही आपल्या अविश्वसनीय उदारतेमुळे नम्र आहोत. आपल्या मदतीने आम्ही एकूण US$४५८,५०१.०० जमा केले आहेत, जे ९६ देशांमधील १४,९०५ लोकांनी दान केले आहेत, जे आमचे उद्दिष्ट, US$१३०,०००.०० या पेक्षा जास्त आहेत! आपल्याशिवाय, हे अशक्य होते. आपण सर्वोत्तम आहात!

OTW ही एक ना-नफा संस्था आहे, ज्याचा अर्थ असा की आपण देणगी दिलेला प्रत्येक डॉलर आमच्या कार्याकडे जात आहे, जे कार्य सर्वांसाठी रसिक-कृती आणि रसिक-संस्कृतीचे संरक्षण करते. यावर्षी तुम्ही Open Doors (रसिक मुक्तद्वार प्रकल्प) समितीला पाठिंबा दर्शविला आहे जेव्हा त्यांनी याहू ग्रुप बंदचापरिणाम कमी करण्याचे काम केले आहे, गट सदस्यांसह आणि नियंत्रकांसह Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर सामग्री आयात करण्यासाठीही तुम्ही सहयोग दिला आहे. आपण AO3 साठी नवीन सर्व्हरच्या, खरेदीस वित्तपुरवठा करण्यास मदत केली आहे, जी आमचा वापर-कर्ता पाया वाढत असताना आम्हाला अधिक स्थिरता देते. आणि आपण आमच्या कायदेशीर समितीला समर्थन दिले आहे, ज्यांनी जगभरातील चाहता-विरोध कायद्याविरोधात युक्तिवाद केला होता. (आमच्या अलीकडील बजेट पोस्टमध्ये आमचा निधी कसा खर्च केला जातो याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळेल.)

आपल्या मदती-मुळे, वर्षानुवर्षे रसिक-कृती समुदाया च्या विकसनशील गरजांचे सक्रिय-पणे समर्थन करण्यास आणि सक्षम करण्यास, आम्ही तयार आहोत. म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद; आम्ही आपल्या समर्थन आणि औदार्यामुळे खरोखरच अभिभूत झालो आहोत. आणि काळजी करू नका: जर आपण ड्राइव्ह कालावधीच्या नंतर देणगी देऊ इच्छित असाल, तर OTW वर्षभर देणगी स्वीकारते!

(कृपया लक्षात ठेवा की कोविड-१९ च्या स्थितीमुळे काही देणगी भेटवस्तू देण्यास विलंब होऊ शकतो. आपल्याला आमच्या देणगी पृष्ठावर याविषयी सर्वात अद्ययावत माहिती मिळेल.)


OTW ही, AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत यां सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत, संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीम बद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.